Translate

Monday, 25 June 2012

रात्रीचा नशा मला चढलाय..

रात्रीचा नशा मला चढलाय..
कोण जाने कसकाय हा रोग जडलाय..
आणि  रात्री चा नशा मला चढलाय..
सकाळी सूर्याची येणारी किरण ..
 अस वाटतय कि जवळ येतंय माझ मरण..
सकाळच्या कोकिळेचा आवाज..
ऐकून काना मध्ये जीवघेणी होते खाज..
जणू वाटतय कुणी सुऱ्याने करतोय माझ्यावर घात 
आणि नरक यातना भोगण्यास सरसावत आहेत हात..
वाटतंय सूर्याच्या प्रकाशानेच केलीये माझी हि दशा
म्हणूनच चढलाय मला रात्री चा नशा..
वाटतय सगळीकडेच काळोख व्हावा ..
आणि माझा देह त्या अंधाऱ्या  सागरात बुडवा..
अनंत सागरात बुडून मी शांत एकटाच असावे..
आणि माझ्या सोबत कुणीही जिवंत नसावे..
ह्या जीव सृष्टी चा मला कंटाळा आलाय ..
म्हणूनच मला हा रोग झालाय...
माणसात माणुसकी नाही राहिली..
आणि हवेशी आद्रता पण संपलीय 
फक्त राहिलंय तर काय???
जिकडे तिकडे स्वार्थी पणा
आणि फक्त हेवा ......
जो तो बसलाय खाण्यास एकमेकांच्या 
अनमोल जीवनाचा मेवा...
कारण एकाच तर फुकट मिळणारा सूर्य प्रकाश ..
आणि अनंत हवेच खजिना असलेले आकाश..
आता ह्या नैसर्गिक देणग्याची हेवा वाटतेय 
आणि हेच दुःख माझ्या मनात कुठ तरी दाटतय..
हेच कारण आहे कि मला ...
भयंकर रोग जडलाय..
आणि रात्री चा नशा चढलाय..

No comments:

Post a Comment