Translate

Monday, 25 June 2012

प्रेम गोजिरे गोजिरे..

प्रेम गोजिरे गोजिरे..
त्याला सुख-दुःख साजिरे...
माया आई ची अनंत ..
त्यात कसली तुला खंत..
बाप पाठीशी रे उभा..
असुदे रावणाची सभा..

माय तुझी रे हि माती 
बाप तुझा शेतकरी 
उन्हा-तनात तापून 
तुला ठेवलं रे जपून 
हृदयाच्या अमृताचा ठेवा 
तुला जीवनभर पुरावा..
म्हणून झीझविल्या रे टाचा 
तुला दिली मधुर वाचा..

प्रेम गोजिरे गोजिरे 
त्याला सुख-दुःख साजिरे..
माया आई ची अनंत 
त्यात कसली तुला खंत ..

घागरीने पाणी शेंदून 
अखंड गगनाला भेदून 
 पाजविले तुला अमृत 
आयुष्य केल रे सुसंस्कृत 
बापाच्या देहाची सावली 
जशी विठ्ठल माउली
देऊन तुला सुख त्यानं
ओढलं अंगावर ऊन
काळा पडला तुझा बाप 
सोसून जगाचा रे ताप 
देऊन प्रीतीचा गारवा 
त्याने भरला रंग हिरवा..

प्रेम गोजिरे गोजिरे 
त्याला सुख-दुःख साजिरे 
माया आई ची अनंत 
त्यात कसली तुला खंत 

जखमेच दुःख भुलवून 
तुझ आयुष्य दिल फुलवून 
काट्या-कुट्यावर चालून 
तुझसाठी फुलांचं अंथरून घालून..
त्यांनी सोसला रे ताप 
म्हण त्यांना माय-बाप 
करा आयुष्याच तप
त्यांच्या जीवानाला जप ..

प्रेम गोजिरे गोजिरे
त्याला सुख-दुःख साजिरे 
माया आई ची अनंत 
त्यात कसली तुला खंत 
बाप पाठीशी रे उभा 
असुदे रावणाची सभा 

कवी: बळीराम भोसले

No comments:

Post a Comment