Translate

Monday, 25 June 2012

कसली ग तुला चिंता

कसली ग  तुला चिंता....बये कसली ग तुला चिंता 
नवरा बेवडा मिळायची 
कि प्रियकर सोबत पळून जायची.
आई-वडलांच्या अब्रू ची 
का लग्नासाठी लागणाऱ्या हुंड्याची..
कसली ग तुला चिंता..बाई कसली ग तुला चिंता 
रात्री ची तुझी झोप उडाली
कारण तूच त्याच्या प्रेमात बुडाली 
त्याला नाही ग बाई तुझी चिंता.
मग होवूदेन प्रेमाची चिता 
मनाच्या भावनांमध्ये तूच तरंग्तेस
आणि अर्धवट स्वप्नांना तूच रंगवतेस..
कश्यासाठी हे तू करतेस..
आणि कुणासाठी तू झुरतेस..
संग न ग बाय कसली ग तुला चिंता 
कसली ग तुला चिंता 
साधी भोळी दिसणारी तू..
खूप सुंदर हसायचीस 
आणि रडताना पण शोभून दिसायचीस 
मग का 
खऱ्या सौंदर्याच हरवून भान..
तूच केलास तुझ्या रुपाला घाण..
आणि तेच तुला वाटतंय पण छान
आणि तरी पण तुला सुंदर दिसायची चिंता..
कसली ग बये तुला चिंता ..कसली ग तुला चिंता ..
आत्ताच सावरून घे बर 
नाहीतर होवून जाईल
चिंता ता ता  चिता चिता चिंता ता ता 
--- बळीराम भोसले

No comments:

Post a Comment