Translate

Monday, 25 June 2012

तू आहेस तरी काय....

तू आहेस तरी काय....
दुधावरची साय..
का दिवणारी वेडी गाय..
आता तूला म्हणू तरी काय..
शाहनी झालेली बाय..
का चिखलात अडकलेला पाय..
वेड्यासारखे हसतेस काय...
नवरी सारख लाजतेस काय...
कुणाला म्हणतेस हाय..
तर कुन्हाला म्हणतेस बाय..
जायचं असेल तर जाय..
पण जाताना सांगून जाय..
तुला पाहिजे तरी काय..
पण मला एकच हृदय हाय..
अन ते खायचं असेल तर खाय..
पण एकदाच संग ग बाय..
तुला झालाय तरी काय..
आणि तुझ्या पोटात दडलाय तरी काय..
आता रडन धडन सोड..
बोल माझ्याशी गोड..
तूच  माझी प्रेयसी ..
आणि मीच तुझा प्रियकर...
आता प्रेमाच्या ह्या गाठी 
आपण सोडायच्या सदा साठी..
सोड ह्या जगाची भीती..
अग लाजतेस तू किती...
आपल्या ह्या एकाच भेटीत 
घे तू मला मिठीत..
काय बोलायचं ते बोलून टाक..
अन फिरव आपल्या प्रेमाचं चाक..
पकड शेवटचा बाक..
आणि दे एकदाच हाक..
मग येयील तुला खूप मजा..
भेटू दे आता काही पण सजा,..
विसरून जा या जगाला..
आग लागुदे ढगाला..
एकदाच आपण भिजूया..
अन ढगान खाली निजुया.
एव्हड सांगून तुला पण कळत न्हाय..
आता तू काय लहान पोरगी हाय..
सांगून तर टाक न..
तू आहेस तरी काय..
दुधावरची पांढरी साय..
का दिवनारी वेडी गाय..
किती पण सांगून कळत न्हाय..
एव्हडी कशी नासमज हाय...

कवी: बळीराम भोसले

No comments:

Post a Comment