Translate

Monday, 25 June 2012

तर सांगा त्यात अमूच काय चुकलं

तर सांगा त्यात अमूच काय चुकलं 
ह्या अर्धवट आयुष्यात खूप काही वाचलं..
अन नाही नाही ते ह्या डोक्यात जावून साचलं
सकाळचं जेवनच नव्हत पचल
तोपर्यंत तर आम्ही रानो रान जावून वेचलं..
वेचलं तर वेचलं,  त्यावर आणखी मास्तरांनी पण खेचलं
खेचलं तर खेचलं, काही नाही पण वरून मिरची टाकून ठेचल..
तर सांगा अमूच काय चुकलं 
जाती धर्माच्या नवा खाली यांनीच आम्हाला चिरडल
आणि प्रगती मार्ग कडून अमूच मुंडकचं मुरडलं  
रात्र दिवस डोक्यात ठेवून मार्कांचा ध्यास 
आम्हीच केला होता यांच्यावर विश्वास.
पण ह्यांनी काय केल..
आमच्या विश्वासच पाखरू पायाखाली तुडवलं 
आणि अंकांच्या बाणा मध्ये सररर कून उडवलं..
सांगा ह्यात अमूच काय चुकल..
कवी: बळीराम भोसले

No comments:

Post a Comment