Translate

Monday, 25 June 2012

त्यात पुढ आमचंच नाव..

रात्रीच्या गप्पा सोबत..ते पत्त्यांचे डाव..
मग काहीही असो..त्यात पुढ आमचंच नाव..
होस्टेल मधला गोंधळ...
त्या विंग मधल्या दारूच्या बाटल्या..
बाथरूम मधला चिखल असो वा..
फुटलेल्या खिडकीच्या काचा 
कुठलेही कारनामे..असो कुठलेही डाव..
त्यात पुढ असे आमचंच नाव..
कधी मुलींना छेडण .
तर कुणाच थोबाड पण फोडण..
भांडणा वर भांडण..
आणि कॉलेज पुढे मांडणं..
काही पण असो..त्यात पुढ आमचंच नाव..
--बळी भोसले 

No comments:

Post a Comment