Translate

Monday, 25 June 2012

इथे विद्यार्थी नव्हे तर यंत्र बनवले जातात.

बाथरूम मध्ये ओरडून गाणे म्हणणारी ...
लेक्चर बुडवून कॅन्टीन वर बसणारी...
एक्झाम मध्ये चीट मारताना ना घाबरणारी..
अन एक्झाम संपल्यावर मिळून पार्ट्या करणारी....
कुठे गेली हि मंडळी..कुणी संपवले यांना..?
 आणि कोण जवाबदार आहे ह्या सगळ्यांना....?

हि स्वयंचलित यंत्रे...त्या प्राणघातक दुरध्वन्या...ज्यामुळे..
रोज खिडक्या दरांवर  दिसणाऱ्या चिमण्या..
ती कबुतरांची किंचाळणारी पिल्ले..
तो कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज..
आणि ती हळुवार होणारी झुडपांची सळसळ..
हे पण सर्व हरवून बसलोय....न..
दोषी कोण आहे? कोण हे.तंत्रज्ञान...
का तंत्रज्ञान शिकवणारी मंडळी..?
का तंत्रज्ञान शिकणारी हि यंत्रे..?
..
इथे माणूस म्हणून ओळख कुणाची..
अभियांत्रिकी शिकणाऱ्या मुलांची..
कि यंत्राने तोडल्या जाणाऱ्या फुलांची..
कुठे गेली ती बैल-गड्याची मैत्री..
आणि कुठे गेली ती चोरांवर भुंकणारी कुत्री..
हे सर्वच मरण पावले..का विषारी साप यांना चावले..?

यंत्रांमधून निघणारा काळा धूर..म्हणजेच आपली सृष्टी गिळंकृत करणारा असुर..
ज्यामुळे सगळीकडेच काळोख पसरतोय..आणि आपण माणुसकी विसरतोय..
हे सर्वांना कधी कळणार ..अन कधी हे समृद्धी कडे वळणार..?

हि आपली नवीन पिढी..तशी आहे .खूपच ज्ञानी..
आणि हिनेच संपवलं  भू मातेचं शुद्ध निर्मळ पाणी..
ते खळखळ करणारे झरे..त्या पांढर्या शुभ्र नद्या..
आता हे सर्वच काळोखात जाणार आहे उद्या..
यासाठी कोण जवाबदार...तंत्रज्ञान?
तंत्रज्ञान शिकवणारी मंडळी?
का तंत्रज्ञान शिकणारी यंत्रे..?

आता सगळीकडेच पसरली आहेत हि तंत्रे
आणि मानव निर्मित स्वयंचलित अन  निर्जीव यंत्रे..
कानांना किर्र करणारे आणि झोपेतून उठवणारे ते अलार्म ..
आणि रात्री झोपी घालणाऱ्या त्या डोकेदुखी रंगीत चित्रफिती..
ह्या सर्वांचाच गराडा झालाय आपल्या भोवती..
आता पक्षी बघायचेत तर चित्रफीतीत..
आणि त्यांचा आवाज ऐकायचा तो अलार्म मध्ये..

या सार्वांना जवाबदार आपणच........
कारण इथे विद्यार्थी नव्हे तर यंत्र बनवले जातात.
आणि जे कि अन्न सोडून इतर प्राण्यांचा जीव खातात..
 
कवी: बळीराम भोसले

No comments:

Post a Comment