Translate

Saturday, 10 November 2012

म्हणे प्रियकर..


म्हणे प्रियकर..
बाप विष प्यायलेला 
आईच्या डोळ्याला धार..
आणि ती ..म्हणे प्रियकर..
प्रियकर आणि फक्त प्रियकर..
पण विचार केलाय का कशासाठी..??

"मुलीच करायचं लग्न..
म्हणून बाप विचारात मग्न..
माय तिची इतकी भोळी..कि 
जणू नाते जुंपणारा कोळी..
आणि ह्या बिचारीला पाहिजे 
मागे फिरणारी.. मुलांची टोळी.."

"टोळीतला पाहिजे एक किडा..
ज्या संगे उचलेल लग्नाचा विडा 
मग माय हिची रडो..
का बाप अडचणीत पडो..
कसलीच नाही चिंता.."

मग बाप ..
आग पोरी ऐक ना...
"नको धरू ग ग माझा राग..
काय पाहिजे ते माग..
कुठल्या जन्माच माझ पाप
मी झालोय तुझा बाप.."


मग आई ..
आग पोरी..
मीच ग तुझी सख्खी माय..
तू मला काही सावत्र न्हाय..
कोरडा पडला ग तुझा बाप..
मारू नको न तोंडावर चाप..


आणि मग चक्क धमकी..
बाबा , मीच न तुम्ह्ची लाडकी
मला उशीर व्हायचा तर..
तुम्हीच घ्याची न धडकी..
मग कसला त्रास हो तुम्हाला.
प्रतिष्ठा गमावण्याचा..
का माझ्या जगण्याचा...
मला एकाच उत्तर द्या..
तुम्ही आयुष्यभर कमावलेला मान..
का माझा प्राण...


या पुढे काय घडेल याची शाश्वती परमेश्वर पण देवू शकणार नाही......

ब. भोसले

No comments:

Post a Comment